मुंबई :
हवाई क्षेत्रातील सर्वात मोठी ऑर्डर नोंदवल्यानंतर भारतातील हवाई कंपनी इंडिगोचे समभाग जवळपास 3 टक्के इतके शेअरबाजारात वाढताना दिसले. मंगळवारच्या सत्रात कंपनीचा समभाग 2.76 टक्के वाढत 2499 रुपयांवर पोहचला होता. इंडिगोने 500 ए 320 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा सकारात्मक परिणाम समभागावर दिसला. पॅरीस हवाई प्रदर्शनात कंपनीने एअरबससोबत विमान खरेदीचा करार केला आहे.









