नवी दिल्ली
एज्युटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी बायजू यांनी पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचे धोरण राबविले असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. अशा रितीने विविध विभागातून एकूण 2 टक्के इतका कर्मचारीवर्ग कंपनीने कमी केला आहे. या आधीही कंपनीने ऑक्टोबर 2022 ते पुढील 6 महिन्यामध्ये 2500 जणांना कमी करणार असल्याचे म्हटले होते. त्या धोरणाअंतर्गतच सध्याची ही कपात असल्याचे बोलले जाते. सध्याला कंपनीमध्ये असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 50 हजारच्या आसपास आहे.









