मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मायकल लोबोंना वाढदिनी आश्वासन : त्यांच्या कामास सरकार, पक्षाचा व आपला सदैव पाठिंबा
म्हापसा “: लोकांसाठी काम करतात त्यांना लोक स्मरतात व लोक त्यांच्याबरोबर राहतात हे मायकल यांनी दाखवून दिले आहे. थोडासा काळ ते बाजूला गेले तरी लोक त्यांच्याबरोबर राहिले व त्यांनी आपले काम सदैव असेच सुरू ठेवले. मायकल लोबो यांनी लोकांबरोबर राहावे त्याचबरोबर भाजपचेही काम जोरात करावे. ‘अच्छे दिन आनेवाले है. मायकलसाठी भिवपाची गरज ना’. त्यांचा मतदारसंघ विकसित करण्यासाठी सरकार व मुख्यमंत्री म्हणून आपण सदैव त्यांच्याबरोबर आहे. त्यांची कुठलीच कामे अडून राहणार नाही. त्यांच्या कामास आपला, सरकारचा व पक्षाचाही सदैव पाठिंबा असणार, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रा येथे बोलताना केले. आमदार मायकल लोबो यांच्या वाढदिनी केक कापल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, केदार नाईक, संकल्प आमोणकर, जिल्हा पंचायतसदस्य संदीप बांदोडकर, रमेश घाडी, गुऊदास शिरोडकर, यशवंत कांदोळकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजप उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, सुदेश शिरोडकर, आमदार डिलायला लोबो, पर्रा सरपंच चंदानंद हरमलकर, प्रदीप मोरजकर, रत्नाकर वेर्लेकर, अविनाश नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभेच्छा
यावेळी आमदार केदार नाईक यांनी स्वागत केले व आमदार लोबो यांना शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष दत्ता खोलकर म्हणाले, सर्वांच्या साक्षीने आज मोठा वाढदिवस साजरा झाला आहे. यापुढेही लोबोनी मोठ्या उत्साहात पक्षासाठी काम करावे असे सांगून शुभेच्छा दिल्या. पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, आपण सदैव आपली कामे घेऊन मायकलकडे यायचो. निवडणुकीवेळीही अनेक काम आपण लोबोकडून करून घेतली आहे. त्यांचा पाठिंबा आपल्यास सदैव लाभला. यापुढेही लोबो दांपत्यांनी यापुढेही जोरात काम करावे, असे आर्लेकर म्हणाले.
आम्ही आंदोलनात लाठ्या खाऊन आज आमदार झालो- मायकल लोबो
आमदार मायकल लोबो म्हणाले, 2005 साली आपण व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजपात ऊजू होऊन रितसर प्रवेश तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली केले. त्यावेळी पर्रीकर युवा अध्यक्ष होते त्यावेळी आम्ही आंदोलन करण्यास जाताना पोलिसांच्या लाठ्या खूप खालल्या आहेत. मुख्यमंत्री, आपण तसेच त्यावेळी तानावडे आमदार होते. आम्ही चांगले व वाईट दिवस पाहतच आम्ही 2012 साली आमदार झालो आहोत. जो पाठिंबा राज्यातील नागरिकांनी आम्हाला दिला आहे तो सदैव राहावा व जी चांगली कामे करायला पाहिजेत ती आम्ही कऊया. मुख्यमंत्र्यांकडून गोव्याची सर्व कामे पूर्ण होऊ द्या. अच्छे दिन सदैव येणार. आम्ही सर्वांनी एकत्रित कामे कऊया असे आमदार लोबो म्हणाले. सूत्रसंचालन प्रदीप मोरजकर यांनी केले तर आमदार डिलायला लोबो यांनी आभार मानले. विविध स्तरावरील मान्यवर, अधिकारीवर्ग, मंत्री, आमदार, सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य आदींनी आमदार लोबो यांना शुभेच्छा दिल्या.









