शेतकरी वर्गातून समाधान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द अलतगा गावाजवळून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीवर कंग्राळी खुर्द अलतगा गावातील शेतकरी वर्ग व इतर नागरिकांनी ये-जा करण्यासाठी मंजूर बंधाऱ्यांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. कंग्राळी खुर्द व अलतगा गावातील नागरिकांना शेतीकडे जाणे अनुकुल व्हावे यासाठी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी मागणी केली होती. या भूमीपूजनामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. सदर बंधाऱ्यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या फंडातून 10 लाख ऊपये मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच केपीसीसी सदस्य मलगौंडा पाटील यांनीही शेतकऱ्यांची ही मागणी जारकीहोळी यांच्या नजरेला आणून प्रयत्न करून कायमस्वऊपी बंधारा मंजूर केल्यामुळे त्यांचेही आभार मानले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा पाटील होते. ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे यांनी प्रास्ताविकमध्ये सतीश जारकीहोळी व मलगौडा पाटील यांचे अभिनंदन करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी मलगौडा पाटील यांच्या हस्ते बंधारा कामाचे पूजन करून कुदळ मारून खोदाई कामाला प्रारंभ केला.
शेतकऱ्यांची गैरसोय दूर
मार्कंडेय नदीवर बंधारा होत असल्यामुळे कंग्राळी खुर्द व अलतगा गावातील शेतकऱ्यांची सुविधा होणार असल्यामुळे आता सर्वांना शेतीकामे करणे सोयीचे होणार आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील, वैजू बेन्नाळकर, कल्लाप्पा पाटील, गिरीजा सुतार, अनिल पावशे, परशराम चिखलकर, परशराम पाटील, जितेंद्र पाटील, तानाजी पाटील, कंत्राटदार महेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत धुडूम यांनी केले. कल्लाप्पा चौगुले यांनी आभार मानले.









