जत, प्रतिनिधी
Gopichand Padalkar News : जत तालुक्याचा हा शेवटचाच दुष्काळ असेल. विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम लवकर सुरू होईल. तालुकाचा दुष्काळ हटवण्याची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीतच आहे, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.जत तालुक्यातील संख येथील बाबा मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या “मोदी @9” अभियान अंतर्गत टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षांनी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील होते.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी युती सरकारने एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आणखी हजार कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होईल महाविकास आघाडीने जत तालुक्याला एक रुपयाचा निधी दिला नाही.जयंत पाटील यांनी गावोगावी पोस्टर लावले पण एक रुपयाचाही निधी दिला नाही ही खोटं बोलणारी माणसं आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.जत तालुक्याला भाजपमध्येच पाणी देण्याची क्षमता आहे व प्रामाणिकपणा आहे.तम्मनगौडा रवीपाटील यांच्या खांद्यावर भाजपची जत तालुक्याची धुरा दिली आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तालुक्याचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शक्ती पणाला लावू,असेही आमदार पडळकर म्हणाले.
पक्ष घराघरात पोहोचवणार: रवी पाटील
तमन्नगौडा रवी पाटील म्हणाले की जत तालुक्याची सेवा करण्याची संधी पक्षाने दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे हे अभियान प्रत्येक व्यक्ती व घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. तालुक्याचे विशेषता पाणी योजनेचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. ही प्रश्न केवळ भाजप हा पक्ष सोडवू शकतो. विस्तारित म्हैसाळ योजनेचे भूमिपूजन लवकरच होईल. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस ज्येष्ठ नेते व माजी सभापती डॉ.आर.के.पाटील,भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज,उद्योजक विजय चिपलकट्टी,शंकर वगरे,माडग्याळचे नेते महादेव माळी,उमदीचे सरपंच मुतुराज तेली,हिंदकेसरी असलम मुजावर,प्रा. कृष्णा कोंडीकीरे,मारुती देसाई,भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष पिरगोंडा कोळी,विजय बिराजदार,सोन्याळचे सरपंच बसवराज तेली,जाडरबोबलादचे सरपंच रामण्णा निवर्गी, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर,बागेवाडीचे माजी सरपंच नाना ऐवळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल तम्मनगौडा रवीपाटील यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. आर. के. पाटील सर ,ह. भ. प तुकाराम बाबा महाराज, शेतकरी संघटनेचे नेते राजू पुजारी,रामचंद्र हतळ्ळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार गोपीचंद पडळकर व विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मन्गौडा रवीपाटील यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.