मणेराजूरी / वार्ताहर
Sangli News : तासगांव पंचायत समितीमधील छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करा २२ जूनपर्यत कारवाई न झाल्यास संबधित अधिकाऱ्यांना काळे फासू अशा इशारा तासगावात बाजार समिती संचालक रामचंद्र (खंडू ) पवार यांनी तासगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
तासगाव पंचायत समितीकडील छोटे पाटबंधारे विभागातील अधिकारी हे जनतेच्या प्रश्नांना ते काडीचीही किंमत देत नाहीत. अशा मस्तवाल आणि मग्रूर अधिकाऱ्यांना निलंबित करा,अशी मागणी तासगाव बाजार समितीचे संचालक रामचंद्र ( खंडू ) पवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांना दिले आहे. दरम्यान या आंदोलनाचा धसका घेतल्याने सोमवारी अधिकाऱ्यांचे पथक मणेराजूरीत पाहणीसाठी येणार असलेचे अविनाश मोहीते यांनी स्पष्ट केले.
मोहिते यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे विविध विभागाचे अनेक बंधारे आहेत. या बंधार्यांना अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. गळतीमुळे बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नाही. याबाबत पंचायत समितीकडे निवेदन देऊन जे बंधारे छोटे पाटबंधारे विभागाकडे आहेत, त्याची पाहणी करून दुरुस्तीबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही केली होती.
हेही वाचा- …तेव्हा पुरुषांना लिहायला जागाच उरणार नाही- प्रा. जी. के. ऐनापुरे
आमच्या मागणीनंतर छोटे पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता मणेराजुरी येथे आले.मात्र त्यांनी केवळ दोनच बंधारे पाहिले. या बंधार्यांची पाहणी केल्यानंतर ते निघून गेले.आम्ही गावातील इतर बंधाऱ्यांचीही पाहणी करा व जे बंधारे तुमच्या विभागाकडे आहेत,त्याच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करा,अशी मागणी केली.मात्र या अधिकाऱ्याने आमचे काहीही ऐकून घेतले नाही.अतिशय मग्रूर व मस्तवालपणात ते निघून गेले.या अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नाचे काहीही देणे घेणे नाही, असे दिसते. ते लोकांच्या प्रश्नांना काडीचीही किंमत देत नाहीत.त्यामुळे या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी,अन्यथा कार्यालयात घुसून या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासू,असा इशारा पवार यांनी दिला आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी अविनाश मोहीते यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, मणेराजूरीतील बंधाऱ्यासंदर्भात तातडीने अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी गावात पाठवून सर्व बंधाऱ्यांच्या पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे .








