जुने गोवे : चोडण माडेल पंचायत क्षेत्रातील अनेक वर्षे रेंगाळत असलेली विकासकामे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागली असून काही कामे अल्पावधीतच पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात या नाल्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे शेतजमिनीत फुटलेल्या काचा, काटे, प्लास्टिक कचरा पसरून शेतीच्या मशागतीच्या कामात समस्या निर्माण होत असे. त्यामुळे हैराण झालेले शेतकरी गेली काही वर्षे नाल्याचे बांधकाम करण्यासाठी मागणी करीत होते. त्यामुळे नाल्याचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र काही कारणाने सतत रेंगाळत राहिले होते. मात्र आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्वरित लक्ष घालून कामाची सुऊवात केली आणि अल्पावधीतच नाल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आमदारांना धन्यवाद देत आहेत.
मु•ाr येथील धोकादायक वळण रेलिंग उभारून केले सुरक्षित
या धोकादायक वळणावर तात्पुरता दगडी कठडा उभारण्यात आला होता पण वाहनाची धडक बसून तात्पुरता कठडा कोसळल्याने वाहन चालकांना हे वळण धोकादायक ठरत होते. लोखंडी रेलिंगसाठी मंजुरी मिळूनही पाच-सहा वर्षांपासून काम रेंगाळत होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नामुळे लोखंडी कठडा उभारण्याचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे.
मुख्य रस्त्यावर गतिरोधकाची उभारणी
मुख्य रस्त्यावर काही धोक्याच्या ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी ग्रामसभेत नागरिकांकडून सतत होत असल्याने पंचायतीने गतिरोधक उभारणीचा प्रस्ताव पाठवून परवानगी मिळवली. मात्र हे काम रखडले होते. पण कार्यतत्पर आमदारांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे चोडणच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक उभारण्याचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे. आपल्या कारकिर्दीच्या अल्पावधीतच अशा प्रकारची विकास कामे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पूर्ण केल्यामुळे त्यांची लोकप्रियता सतत वाढत आहे.









