नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : पिरनवाडी नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
हुंचेनहट्टी मारुती गल्लीतील गटारी बांधण्यासाठी काही ठिकाणी घरांच्या बाजूला खोदून ठेवले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यापासून गटारीचे बांधकाम केलेली नाही. पिरनवाडी नगरपंचायत व सदर कंत्राटदाराचे या कामकाजाकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. याचा आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे अशी माहिती नागरिकांनी दिली. मारुती मंदिराच्या पाठीमागच्या गल्लीत गेल्या काही महिन्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साहाय्याने खणून गटारी बांधण्यास सुरुवात केली. बहुतांशी गटारीचे बांधकाम केले आहे. मात्र गल्लीच्या शेवटच्या टोकावरील काही ठिकाणी गटारीच बांधण्यात आल्या नाहीत. घरासमोर गटारीसाठी मोठा ख•ा करण्यात आला आहे. तो ख•ा ओलांडून जाताना धोक्याचे होत आहे. ख•ा ओलांडून आम्ही घरात जायचे कसे असा प्रश्नही काही नागरिकांना पडला आहे. त्या ख•dयामुळे लहान बालकांना घरात ये-जा करणे अवघड बनले असल्याची माहिती काही नागरिकांनी दिले. या गटारीबद्दल अनेकवेळा सदर कंत्राटदाराला सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सरकारमार्फत सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे सरकारी अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अगदी थोड्याच प्रमाणात गटारीचे काम शिल्लक का ठेवले आहे याची विचारणाही नागरिकांतून होत आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पिरनवाडी नगरपंचायतीने सदर गटारीचे कामकाज पूर्ण करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होऊ लागली आहे
आम्ही दाद कुणाकडे मागायची – गौरम्मा बाळेकुंद्री
आमच्या घरासमोर गटार बांधण्यासाठी भला मोठा ख•ा काढला आहे. गेल्या पाच महिन्यापासून आम्ही याचा त्रास सहन करत आहे. सदर कंत्राटदाराला अनेक वेळा विचारले असता गटारी बांधणार आहे असे केवळ आश्वासन मिळत आहे. पिरनवाडी नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? आता पाऊस आल्यानंतर या ख•dयांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे. गटारीचे बांधकाम नसल्यामुळे पाण्याचा निचरा होणार नाही. मग थेट पावसाचे पाणी आमच्या घरात येणार आहे. याची आम्हाला चिंता लागून राहिली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अर्धवट स्थितीत असलेल्या गटारीच्या कामकाजाची पाहणी करावी आणि कामकाज त्वरित पूर्ण करावे अशी आमची मागणी जोर धरू लागली आहे.









