पक्षकारांनी सहभागी होऊन न्याय मिटवावेत : न्यायाधिशांचे आवाहन
खानापूर : राष्ट्रीय लोक अदालत कर्नाटक राज्य लिगल सर्व्हीस अॅथॉरीटी तसेच खानापूर न्यायालय यांच्यावतीने खानापूर न्यायालयात दि. 8 ते दि. 24 जुलैपर्यंत लोक अदालत भरवण्यात येणार आहे. या लोक अदालतीत कौटुंबिक, स्थावर प्रॉपर्टी मालमत्ता, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाणघेवाण यासह इतर सर्वप्रकारच्या वादांवर तोडगा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती झरीना यांनी शुक्रवारी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत न्यायाधीश एस. सूर्यनारायण, न्यायाधीश वीरेश हिरेमठ तसेच तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी म्हणाले, खानापूर तालुक्मयात अनेक प्रलंबित प्रकरणे आहेत. यापूर्वी अनेकवेळा लोकअदालतीचे आयोजन करून अशा प्रकरणावर तोडगे काढण्यात आले आहेत. याचा तालुक्मयातील अनेक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. अनेकांचे संसार लोक अदालतीतून तोडगा काढून सुखी-संसारी बनले आहेत. सहकारी पतसंस्थांच्या देवाणघेवाणीची प्रकरणे तडजोडीने पूर्ण केली आहेत. त्यामुळे या लोक अदालतीचा सर्वसामान्य लोकांना तसेच सहकारी संस्थांनाही याचा फायदा होणार आहे. यासाठी 8 जुलैपासून होणाऱ्या या लोक अदालतीत ज्या ग्राहकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशानी उपस्थित राहून या अदालती अंतर्गत तोडगा काढून न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या लोक अदालतीत ज्या प्रकरणावर तोडगा काढण्यात येणार आहे. अशा प्रकरणांची न्यायालयीन फी माफ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रलंबित प्रकरणाबाबत न्यायालय अनेकांना दंड घालून निर्धारित शुल्काची आकारणी करते, पण या लोकअदालतीत जी प्रकरणे निकालात काढली जाणार आहेत. तसेच सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेल्या दाव्यात अथवा दंड झालेल्या दाव्यात जर दोन्ही पक्षानी मिळून सहकार्याची भूमिका घेऊन लोक अदालतीत लेखी निवेदन दिल्यास त्यांची शिक्षाही कमी केली जाणार आहे. तसेच दंडाची रक्कमही करण्यात येणार आहे. याचाही फायदा पक्षकारानी घ्यावा, असे आवाहन न्यायमूर्ती सूर्यनारायण यांनी केले. या पत्रकार परिषदेत अॅङ केशव कळळेकर, अॅड एस. के. नंदगडी, अॅड. लोकरे, अॅड. इर्शाद नाईक, अॅड. जी. जी. पाटील, अॅड. सिद्धार्थ कपिलेश्वरी, अॅड. एन. वाय. कदम, अॅड. आर. एन. पाटील आदी उपस्थित होते.









