28 जण ऊग्णालयात : पाच जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. उष्माघाताने मृत्यूच्या घटना वाढत असून गेल्या 24 तासात भोजपूर, नालंदा, गया आणि जमुई जिह्यात 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मृतांमध्ये रोहतास येथील दोन एसएपी जवानांचाही समावेश असल्याचे समजते. उष्माघाताने आजारी पडलेले 28 जण औरंगाबादसह वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बिहारमध्ये पाच जिह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सासाराम दिवाणी न्यायालय संकुलाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन एसएपी जवानांचा मृत्यू झाला. गेट 3 येथे तैनात असलेले एसएपी जवान गौरी प्रसाद हे मूळचे नवादा जिह्यातील रहिवासी होते. आराहमध्ये एक तरुण आणि एक वृद्ध व्यक्ती वाटेत मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले. डाक बंगला चौकात साफसफाईचे काम करत असताना एकाला अचानक चक्कर आली. सहकाऱ्यांनी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.









