गुरुग्राममध्ये जीएसटी अधिकाऱ्यांकडून पर्दाफाश
► वृत्तसंस्था / गुरुग्राम
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी 461 बनावट कंपन्यांचा भंडाफोड करत 863 कोटींच्या फसवणुकीचा प्रकार उघड केला आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या गुऊग्राम झोनल टीमने या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. सदर रॅकेटकडून 863 कोटी ऊपयांच्या बनावट इनपुट टॅक्स व्रेडिटची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुऊग्राम झोनल युनिटने छापेमारी कारवाईदरम्यान हा बनाव उघडकीस आणला. छाप्यादरम्यान जीएसटी अधिकाऱ्यांना बनावट संस्थांद्वारे इनपुट टॅक्स व्रेडिटची बनावट माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे जीएसटी विभागाने मुख्य कार्यालयावर छापा टाकल्यानंतर हा बनाव समोर आला. या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट भाडेकरार, वीजबिल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड अशी कागदपत्रे सापडली आहेत. या कागदपत्रांचा वापर बनावट कंपन्या चालवण्यासाठी केला जात होता. छाप्यावेळी कार्यालयातून जप्त केलेले लॅपटॉप आणि अन्य उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. बनावट इनपुट टॅक्स व्रेडिटमध्ये फसवणुकीचे हे प्रकरण लोह आणि पोलाद क्षेत्राशी संबंधित असल्याचे समजते.









