निफ्टी 18,800 अंकांवर : कल्याण ज्वेलर्स 15 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात भारतीय भांडवली बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत तेजी प्राप्त करत बंद झाले आहेत. यामध्ये वित्त, कॅपिटल गुड्स आदी समभागांच्या कामगिरीचा बाजाराला लाभ झाल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 466.95 अंकांनी वधारुन 0.74 टक्क्यांसोबत निर्देशांक 63,384.58 वर बंद झाला आहे. यासह दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 137.90 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 18,826.00 वर बंद झाला आहे. यावेळी कल्याण ज्वेलर्सचे समभाग शुक्रवारी 15 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले आहेत.
या क्षेत्रांची चमक
भारतीय शेअर बाजाराची सकारात्मक कामगिरी झाली आहे. यामध्ये मुख्य क्षेत्रांची स्थिती पाहिल्यास यामध्ये कॅपिटल गुड्सचे निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. यासोबतच एफएमसीजी आणि हेल्थकेअर 0.5 ते 0.5 टक्क्यांच्या मजबुतीसोबत बंद झाले आहेत. मात्र यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक हा 0.38 टक्क्यांनी घसरुन बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.24 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासह टायटन, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि बजाज फायनान्स यांचे समभाग 1 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारुन बंद झाला आहे. या व्यतिरिक्त इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि एनटीपीसीचे समभाग तेजीसह बंद झाले. याच्या विरुद्ध बाजूला विप्रोचे समभाग 1.94 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीत राहिले.
तज्ञांच्या नजरेतून…..
अंतिम सत्रात बँकिंग, औषध आणि कंझ्युमर यांच्या समभागातील लिलाव आणि जागतिक बाजारामध्ये सकारात्मक संकेत होते. यामुळेच देशातील बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामुळे आगामी काळात बाजार कोणती दिशा प्राप्त करणार हे आता पहावे आहे.