बेळगाव : गडहिंग्लज रोलर स्केटिंग अकादमी आयोजित खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 11 जून रोजी मार्केट यार्ड स्केटिंग रिंक संकेश्वर रोड बेळगाव येथे पार पडल्या. या चॅम्पियनशिपमध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या स्केटर्सने 5 सुवर्ण, 6 रौप्य, 16 कांस्य अशी एकूण 27 पदके जिंकली आहेत.
पदक विजेत्या स्केटरची नावे
दक्षता मालुचे 1 सुवर्ण, सई पाटील १ सुवर्ण, अमिषा वेर्णेकर 1 कांस्य, श्लोक भोजनावर १ रौप्य, अनमोल चौगले 1 सुवर्ण, रचित नांगरे 1 कांस्य, तेजस साळुंखे 1 कांस्य, सोहन हिरेमठ 1 कांस्य, नचिकेत शेट्टी 1 कांस्य, निरीक्षा शेट्टी 1 रौप्य, त्रिशा दंडगल 1 रौप्य, सृष्टी बोगार 1 कांस्य, समीर महात 1 कांस्य, पंकज कुपाणी 1 कांस्य, दुर्वा पाटील 1 रौप्य, स्वरा सामंत 1 कांस्य, हर्ष कट्टीमणी १ कांस्य, आराध्या हल्याल १ कांस्य, समीर महात 1 कांस्य, खुशी आगसीमणी 1 कांस्य, श्री रोकडे १ सुवर्ण, तेजस साळुंखे 1 रौप्य, सिद्धी पाटील १ रौप्य, अर्शन माडीवाले 1 सुवर्ण, सुकन्या कुपानी १ कांस्य, अन्वी सोनार कांस्य, रुत्रा दळवी 1 कांस्य, आदिेशेश हलियाल १ कांस्य
सर्व स्केटर्स केएलइ स्केटिंग रींक व गूड शेफर्ड स्केटिंग रिंक वर प्रॅक्टीस करत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन लाभले.









