अन्यथा आंदोलन छेडणार, मांद्रे काँग्रेस गटातर्फे पेडणे रस्ता विभागाला निवेदन
पेडणे ( प्रतिनिधी)
मांद्रे मतदारसंघात ठिकठिकाणी भूमिगत वीज केबल घालण्यासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे वारंवार वारंवार अपघात होत आहेत. मात्र संबंधित कंत्राटदार आणि संबंधित खात्याच्या बेजबाबदारपणामुळे हे अपघात होत आहेत. सरकारने त्वरित हे रस्ते दुऊस्ती करून द्यावे, अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा मांद्रे काँग्रेस गटातर्फे देण्यात आला. यासंबंधी पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता शिवनाथ मळीक यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी काँग्रेस प्रदेश सदस्य बाबी बागकर, मांद्रे गटाध्यक्ष नारायण रेडकर, उत्तर गोवा काँग्रेस सरचिटणीस प्रणव परब, काँग्रेसचे पदाधिकारी मिंगेल फर्नांडिस, बाबूसो तळकर, अॅड जितेंद्र गावकर, गुऊदास पांडे, बापू विर्नोडकर, गंगाराम मांद्रेकर, रामचंद्र पालयेकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी मांद्रे काँग्रेस गटातर्फे पेडणे तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंते शिवानंद गावस यांना निवेदन सादर करून मांद्रे मतदारसंघात केबल टाकण्यासाठी भूमिगत केबल वाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदलेला आहे. या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात वारंवार अपघात होत असतात. पावसाळ्यात पाणी सर्वत्र साचून यापुढे अपघाताची शक्यता असल्याने सरकारने आणि संबंधित खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन हे खडे आणि रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
मांद्रे मतदार संघात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी सर्वत्र रस्ता खोदून केबल टाकल्या आणि या रस्त्यांचे खोदकाम गेल्या तीन-चार महिन्यापूर्वी करण्यात आले. मात्र हे रस्ते संबंधीत कंत्राटदाराने दुऊस्ती केले नाहीत. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तसेच अनेकांची वाहने यामुळे मोडकळीस आलेली आहेत. मात्र संबंधित खाते तसेच या भागाचे आमदाराचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरकारने आणि संबंधित आमदाराने याकडे त्वरित लक्ष घालून या रस्त्याचे काम करून घ्यावे अशी मागणी मांद्रे काँग्रेस गटाध्यक्ष नारायण रेडकर यांनी केली.
रस्ता विभागावर मोर्चा नेणार : प्रणव परब
सरकारने गेल्या अनेक महिन्यापूर्वी खोदलेले रस्ते आज पावसामुळे चिखलमय झाले. तसेच ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात माती साचली आणि खड्यातून वाहन काढताना चालकांना बरीच कसरत करावी लागत आहे. सरकारने त्वरित या रस्त्यांची पाहणी करून दुऊस्ती करावी, अशी मागणी उत्तर गोवा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रणव परब यांनी केली.