प्रतिनिधी / बेळगाव
सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल, बेळगाव येथे सुरू असलेल्या अग्निवीर वायुच्या प्रशिक्षणार्थींचे (नॉन कॉम्बेटन्स) प्रशिक्षण संपत आले असून दि. 17 जून रोजी त्यांचा दीक्षांत समारंभ (पासिंग आऊट परेड) होणार आहे. 144 प्रशिक्षणार्थींनी 24 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याप्रसंगी ट्रेनिंग कमांडचे सिनियर मेन्टेनन्स स्टाफ ऑफिसर एअर व्हाईस मार्शल व्ही. राजशेखर उपस्थित राहणार आहेत.









