ऑकलंड : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसीच्या 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलला मुकावे लागणार आहे. दुखापतीमुळे तो या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळू शकणार नाही अशी माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या इंग्लिश टी-20 ब्लास्ट क्रिकेट स्पर्धेत वुरसेस्टरशायर रॅपिड्स संघाकडून फलंदाजी करताना ब्रेसवेलला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला जवळपास 6 ते 8 महिने क्रिकेट क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागत आहे. गुरुवारी ब्रिटनमध्ये त्याच्या या दुखापतीवर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. न्यूझीलंडचा संघ संयुक्त अरब अमिरातबरोबर पहिला टी-20 सामना खेळणार आहे.
Previous Articleअष्टपैलू क्रिकेटपटू बनवण्याचा बीसीसीआयचा कल
Next Article महत्वपूर्ण दौऱ्याची उत्सुकता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









