अॅड. रमाकांत खलप यांची माहिती
पणजी : कोकण मराठी परिषद, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, वास्को रवींद्र भवन, प्रागतिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 17 रोजी, 18 रोजी आणि 20 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड येथील अॅड. संभाजीराव मोहिते यांचे छत्रपती शाहू महाराजांवर विविध ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोमपचे अॅड. रमाकांत खलप यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शनिवार दि. 17 रोजी सायं. 4.30 वा. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात, रविवार दि. 18 रोजी सायं. 6 वा. वास्को रवींद्र भवन येथे आणि मंगळवार दि. 20 रोजी प्रागतिक विचार मंच गोवातर्फे फोंडा येथील थ्रिफ्ट सभागृहात सायं. 4.30 वा. अॅड. संभाजीराव मोहिते यांचे व्याख्यान होणार आहे. आतापर्यंत संभाजीराव यांचे महाराष्ट्र व इतर ठिकाणी एकूण 1200 व्याख्याने झाली आहेत. गोव्यात अॅड. संभाजीराव पहिल्यांदाच येत असल्याचे अॅड. खलप यांनी सांगितले.









