रस्त्यावर झाडेझुडपे वाढल्याने अपघाताला आमंत्रण
वार्ताहर /नंदगड
हत्तरवाडपासून नागरगाळीपर्यंतच्या सुमारे 12 किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या बाजूला मोठ्या चऱ्या पडल्या आहेत. या भागात घनदाट जंगल असल्याने पाऊस मोठा होतो. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या जंगलामुळे वन्यप्राण्यांची संख्याही वाढली आहे. वन्यप्राणी रस्त्यावर येतात. ख•dयांमुळे वन्यप्राण्यांना चुकवून वाहन चालवणे वाहनधारकांना आव्हानात्मक बनते. नंदगडपासून दांडेलीला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातच या भागातील कुंभार्डा येथे नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठ असल्याने या रस्त्यावरून येणार जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावरून दांडेलीला लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यातील ख•dयांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. परंतु या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या भागातील जनतेचे म्हणणे आहे.
रस्त्यावरील झाडेझुडपे हटवा
हत्तरवाडपासून नागरगाळीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्याप्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. या भागात पाऊस पडत असल्याने या झुडपांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही झुडपे त्वरित हटविण्याची मागणी हात आहे.
सहा महिन्यात रस्त्याची दुऊस्ती न झाल्यास आंदोलन उभारू
या रस्त्यावर पडलेल्या ख•dयांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. अनेक वेळा विनंतीअर्ज करूनही या रस्त्याची दुऊस्ती होत नाही. आगामी सहा महिन्यात या रस्त्याची दुऊस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.









