म्हार्दोळ येथे व्हीपीके पंचायतीच्या बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन
माशेल : प्रियोळ मतदार संघ संपुर्णरित्या कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट्या गाठण्यासाठी सातही पंचायतीसाठी बायो गॅस प्रकल्प उभारले जाईल. बायो गॅसच्या माध्यमातून भविष्यात पंचायत क्षेत्रासाठी वीजनिर्मितीही करण्यात येईल असे प्रतिपादन क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी केले. वेलिंग प्रियोळ म्हार्दोळ पंचायतीतर्फे उभारण्यात आलेल्या बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. मंत्री गावडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून नामफलकाच्या अनावरणाने प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याच्यासमवेत दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपसंचालक प्रसिद्ध नाईक, गटविकास अधिकारी अश्विन देसाई, वेलिंग प्रियोळच्या सरपंचा हर्षा गावडे, उपसरपंच रूपेश नाईक, वेरे वाघुर्मे पंचायतीच्या सरपंचा शोभा पेरणी व्यासपीठावर उपस्थित होते.
बायो गॅस प्रकल्प प्रियोळ मतदारसंघातील वेलिंग प्रियोळ पंचायतीत उभारलेला पहिलाच प्रकल्प आहे, त्यामुळे कदाचित तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्यास त्याचा कुणी बाऊ करू नये, काही त्रुटी असल्यास आमचे तज्ञ इथे असणार ते लगेच दुरूस्ती करेल. प्रकल्पाचा मुळ मुख्य उद्देश प्रियोळ मतदारसंघाचा कचरा मुक्त करायचा आहे. तेव्हा ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे गावही स्वच्छ ठेवा. बायो गॅसचा उपयोग पंचायतीला होणार असून त्यातून वीजनिर्मितीही होईल. प्रधानमंत्र्यांनी स्वछ भारत मिशन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे आपण प्रधानमंत्र्यानी सांगितल्याप्रमाणे गोवा स्वच्छ करूया त्यासाठी गावागावातील कचरा पंचायतीतर्फे उचलला पाहिजे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. कचरा उचलण्यासाठी पंचायतीतर्फे कचरा कर (गारबेज टॅक्स) आकारले जातो.
स्वच्छ भारत मिशनसाठी मंत्री माविन गुदिन्हो पंचायतीला फंड कमी पडू देत नाही. त्याचप्रमाणे मंत्री गोविंद गावडे प्रयत्न करीत आहे. फोंडयातील सर्व पंचायतीना मी उपसंचालक या नात्याने कमी पडू देणार नाही असे उपसंचालक या नात्याने प्रसिद्ध नाईक म्हणाले. गटविकास अधिकारी अश्विन देसाई म्हणाले की मंत्री गोविंद गावडे यांनी भोम येथील एका कार्यक्रमात बायो गॅस प्रकल्प पियोळ मतदार संघातील पंचायतीवर असल्याचे सांगून लगेच त्यांनी वेलिंग प्रियोळ येथे प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातू आलेल्या कचऱ्याची प्रक्रिया होणार आहे. व्यापाऱ्यांनी एकदा वापरलेले प्लास्टीक पिशव्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावण्यात यावी. प्लास्टीक पिशव्या विशेषत: नाल्यात साचून पाण्याचा प्रवाह बंद होत असतो. त्यामूळे गावातील लोकांनी वेळीवेळी कचऱ्याचे विलगीकरण करून पंचायतीला द्यावे. हर्षा गावडे यानी स्वागत केले. स्वागतपर भाषणात त्यांनी मंत्री गोविंद गावडे यानी प्रकल्पाच्या उभारणीसाठी भरपूर प्रयत्न केल्याचे सांगितले. पाच कोटी रूपयांची विकासकामे मंत्री गावडे यांच्यातर्फे राबविण्यात आलेली असल्याचे सांगून त्याचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव सुशांत नाईक यांनी केले. आदिती गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.









