वाराणसीत करतेय चित्रिकरण
अभिनेत्री नर्गिस फाखरी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. नर्गिसने स्वत:च्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. नर्गिसने याची माहिती स्वत:च्या सोशल मीडिया अकौंटद्वारे दिली आहे. हा चित्रपटाचे चित्रिकरण वाराणसी येथे केले जात आहे.

नर्गिसने वाराणसी येथील अनेक छायाचित्रे अन् व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. नर्गिस अलिकडेच इटलीमधून परतली आहे. नर्गिसने या नव्या चित्रपटाबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. परंतु या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असल्याचे समजते. मागील काही काळात ती चित्रपटांमध्ये दिसून आली नव्हती. यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी पुनरागमनाचा ठरणार आहे.
नर्गिसने 2011 साली रणवीर कपूरचा चित्रपट ‘रॉकस्टार’मधून पदार्पण केले होते. याचबरोबर ती मद्रास कॅफे, फटा पोस्टर निकला हीरो, मैं तेरा हीरो, किक आणि हाउसफुल 3 या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याचबरोबर तिने अॅक्शन कॉमेडी चित्रपट ‘स्पाय’द्वारे हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.









