राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी एसटी आगाराच्या साठ बसेस शासन आपल्या दारी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी आरक्षित झाल्यामुळे राधानगरी तालुक्यातील प्रवासी वाहतूकीच्या काही फेऱ्य़ा उद्या 13 जून रोजी रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांचं मोठे हाल होणार आहेत.
एसटी आगराच्या 60 बसेस या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आरक्षित झाले असल्यामुळे तालुक्यातील प्रवासी वाहतूकीच्या काही गाड्यांच्या फेऱ्या बंद करणाऱ असल्याची माहिती आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी दिली. राधानगरी तालुक्यांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी 60 बसेस आहेत यासाठी बसेस या मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आरक्षित झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत,