दोन संशयित ताब्यात, महामार्गानजीक मिळाला मृतदेह
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये भाजपच्या एका महिला नेत्याचा मृतदेह गोलपाडा जिल्ह्dयात आढळून आला आहे. भाजपच्या या महिला नेत्याचे नाव जोनाली नाथ असे होते. भाजप नेत्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग-17 नजीक आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जोनाली नाथ या गोलपाडामध्ये भाजपच्या जिल्हा सचिव होत्या. रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह कृष्णई सालपर भागात आढळून आला आहे. तत्पूर्वी रविवारी संध्याकाळी त्या वैयक्तिक कामासाठी इस्लामपूरसाठी रवाना झाल्या होत्या अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. रविवार रात्रीपर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. जोनाली यांच्या मृतदेहावर जखमेच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत.
जोनाली यांची हत्या करण्यात आल्याचे मानत गोलपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाजप नेते अशोक सिंघल यांनी जोनाली यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त करत तपासाची मागणी केली केली आहे.









