सातारा प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात 18 जून रोजी आगमन होणार असून जिल्ह्यात पाच दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे.. माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या वतीने 108 जागा बसायची सोय करण्यात आली आहे.. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता विविध मार्गांवरील जागा बसेस सोडण्यात येणार आहेत.. पालखी सोहळ्याचा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड या ठिकाणी मुक्काम असणार आहे.. सातारा आगारातून 17, कराड 14, कोरेगाव 9, फलटण 20, पाटण 5 दहिवडी 7, महाबळेश्वर 6, मेढा 5 पारगाव खंडाळा 9 आणि वडूज आगारातून 8 अशा मिळून 108 बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत..
Previous Articleसाताऱ्यात रायगाव गावानजीक ‘विठाई’ बसला अचानक आग
Next Article पुण्यनगरीत भक्तीचा महासंगम









