ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. आयएमडी पुण्याचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.
🔊SW Monsoon in #Maharashtra today on 11 Jun
नैऋत्य मान्सूनचे आज 11 जून ला #महाराष्ट्रात आगमन.दक्षिण कोकणातील काही भाग,द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग,संपूर्ण गोवा,कर्नाटकचा व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भाग व्यापला.
NLM:रत्नागिरी,शिमोगा,हसन,धरमपुरी,श्रीहरीकोटा … दुभरी
– IMD pic.twitter.com/gz9U93jbOJ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023
8 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळात मान्सून उशिराने आल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळय़ा शक्यतांवर मात करत मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटापर्यंत तो पोहचला आहे.