प्रतिनिधी/ पणजी
भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)ने चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वेंगुर्ला ते वास्को दरम्यान गोव्याच्या किनारपट्टीवर 11 जूनपर्यंत उच्च लाटांचा इशारा दिला आहे. वादळ बिपर जॉयमुळे मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अतिशय तीव्र चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 7 किमी प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकले आणि 10 जून रोजी त्याच प्रदेशात अक्षांश 16.7 होते. रेखांश 67.4 च्या जवळ 08.30 तासांवर केंद्रीत झाले हेते. गोव्याच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 700 किमी, मुंबईच्या 620 किमी पश्चिम-नैर्त्रुत्य, पोरबंदरच्या 600 किमी दक्षिण-नैर्त्रुत्येस आणि कराचीच्या दक्षिणेस 910 किमी. पुढील 24 तासांत ते आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे हळूहळू सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 दिवसांत ते हळूहळू उत्तर-वायव्य दिशेकडे सरकणार आहे.
गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) लोकांना घाबरू नका, लहान जहाजे चालवणे टाळा आणि किनाऱ्याजवळील सर्व मनोरंजन क्रिया पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक: 08322419550, 08322225383, 08322794100 असे आहेत.