Kolhapur Robbery Breaking News : कोल्हापूर पोलिसांनी बालिंगा दरोड्याचा 36 तासांत लावला छडा लावला आहे.दरोडा प्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. विशाल धनाजी वरेकर,(रा.कोपार्डे) आणि सतीश सखाराम पोहाळकर (रा.कणेरकरनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
या दोघांकडून एकूण 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. उरलेले दागिने वरेकर आणि पोहाळकर यांचे परराज्यातील साथीदार घेऊन पळाले आहेत. एकूण 2 कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार दिली होती.
विशेष म्हणजे संशयित आरोपी विशाल वरेकर याने एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना जेलमध्येच मैत्री झालेल्या इतर कैद्यासोबत बालिंगा दरोड्याचा कट रचला होता. त्यांच्या कटामध्ये सतीश सखाराम पोहाळकर सुद्धा सहभागी झाला होता. एकूण चार जणांनी कात्यायनी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला होता. सध्या पोलीस परराज्यातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.