वृत्तसंस्था/ कोची
केरळमधील कोची विमानतळावर शुक्रवारी मलेशियाहून आलेल्या चार प्रवाशांकडून 2,207.24 ग्रॅम वजनाचे विदेशी सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे 1 कोटी 21 लाख 83 हजार 965 ऊपये एवढी आहे. एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या या जप्तीनंतर पुढील कार्यवाही सुरू आहे. सध्या चौघाही प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. चालू महिन्यात केरळमध्ये झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. येथील विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे सोने आणि अन्य मौल्यवान वस्तू विदेशातून छुप्या पद्धतीने आणल्या जातात. सदर वस्तू बेकायदेशीरपणे आणल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर इंटेलिजन्स युनिटकडून कारवाई केली जाते.