केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपदाची मागणी केली आहे. तसेच आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी लोकसभेच्या दोन जागांसह विधानसभेच्या 10 ते 15 जागांवर दावा केला आहे. येत्या काही दिवसात राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याच्या चर्चेच्या पार्श्वभुमीवर रामदास आठवले यांनी हि मागणी केली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटकपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीने लोकसभेसाठी तयारी केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 2024 च्या निवडणुकीत एनडीएच्या कोट्यातून लोकसभेच्या किमान दोन जागा आणि 10 ते 15 विधानसभा जागा मिळायला पाहीजेत” मागणी केली आहे.
“महाराष्ट्रातील पुढील मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआय (ए) ला मंत्रिपद मिळायला हवे. याबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. मी त्यांना पुन्हा भेटेन. मला वाटते की आम्हालाही सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडियाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवायची असून स्वतःचं चिन्हही हवं आहे. यासाठी पक्षाच्या दोन तरी जागा निवडून येणे गरजेचे आहे. या संदर्भात मी स्वता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. आरपीआयला लोकसभेच्या दोन ते तीन जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच संपूर्ण राज्यात विधानसभेसाठी १० ते १५ जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे.” असे ते म्हणाले.