सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याबाबत कारखान्याच्या संस्थापक अध्यक्ष माजी आ.डॉ.शालिनीताई पाटील यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली..यावेळी त्यांनी जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या अन्यायाबाबत माहिती देऊन आवश्यक ती कागदपत्रे सादर केली.
कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील 27 हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा जरंडेश्वर कारखाना हा राजकारणातील धनदांडग्यांनी हडपला आहे, राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी शालिनीताईंनी राज्यपालांकडे केली