आशियाई युवा हॉकी स्पर्धेत पाकचा पराभव
बेळगाव : नुकत्याच झालेल्या आशियाई युवा हॉकी स्पर्धेत भारतीय युवा हॉकी संघाने पाकिस्तान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले आहे. त्याबद्दल बेळगाव धर्मवीर संभाजी चौकात विजयोत्सव साजरा करण्यात आला. आशियाई युवा हॉकी स्पर्धेत भारतीय युवा हॉकी संघाने पाकिस्तान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मवीर संभाजी चौकात ऑलिम्पिकपटू बंडू पाटील यांच्या प्रतिमेला हार घालून गोड पदार्थाचे वाटप व फटाक्याची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या सभासद पूजा जाधव, ज्येष्ठ हॉकीपटू उत्तम शिंदे, सुधाकर चाळके, माजी उपमहापौर संजय शिंदे, ज्येष्ठ खेळाडू मनोहर पाटील, नामदेव सावंत, श्रीकांत उचगावकर, विनोद पाटील, दत्तात्रय जाधव, सुरेश पोटे, अनिल राणे, अजय सातेरीसह हॉकीपटू उपस्थित होते.









