पुणे / प्रतिनिधी :
अंदमान निकोबार बेटांवरुन नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकले असून, गुरुवारी ते दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा काही भाग, कॉमेरुनचा भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात दाखल झाले आहेत.
19 मे रोजी निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर तो बराच काळ या भागात रेंगाळला. 30 मे रोजी पोषक हवामानमुळे मान्सूनला गती मिळाल्याने गुरुवारी त्याने दक्षिण अरबी समुद्र, मालदीव कॉमेरुनचा भाग व्यापला आहे. दरम्यान, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच 4 जूनपर्यंत मान्सून केरळात येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्राचे कमाल तापमान वाढणार
महाराष्ट्रातील कमाल तापमान पुढील दोन दिवसांत 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.