सावंतवाडी प्रतिनिधी
झाड कोसळल्यामुळे वाहतूक खोळंबली !
वारा ,पाऊस, किंवा कुठलेही वादळी हवामान नसताना देखील -वेंगुर्ले -बेळगाव महामार्गावर दाणोली बाजार येथे अचानक भले मोठे झाड पडल्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहने तब्बल एक ते दीड तासाहून खोळंबून वाहनांची रांग दोन किलोमीटर पर्यंत लागली होती. हे झाड कसे काय पडले असा प्रश्न पडला असून वनखात्याने घाटात सध्या स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्या धरतीवर काल स्वच्छता मोहीम करताना सदर झाडाला आग लागल्याने. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक हे झाड आगीत होरपळले आणि ते उन्मळून पडले. सुदैवाने या मार्गावर त्यावेळी कुठलेही वाहन जात नव्हतेत्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरून येजा करणारी वाहने खोळंबून होती .