एक-तृतीयांश अमेरिकन लोकांसाठी कुटुंब महत्त्वाचे
एक तृतीयांश अमेरिकन लोकांसाठी कुटुंबासमेत वेळ घालविणे जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण आहे. या लोकांच्या वैयक्तिक प्राथमिकतांमध्ये शारीरिक हालचाली, धर्म-कर्म, कारकीर्दीतील यश आणि बाहेर फिरण्यापेक्षाही कुटुंबाला वेळ देणे महत्त्वाचे आहे. प्यू रिसर्च अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे.
या अध्ययनानुसार कुटुंबासाठी वेळ देणे 73 टक्के अमेरिकन लोकांसाठी महत्त्वाचे आहे. एप्रिलमध्ये झालेल्या या अध्ययनात कुटुंब, हिंडणे, धर्म-कर्म, सामाजिक सक्रीयता आणि कारकीर्दीतील यश यासारख्या मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

कुटुंब महत्त्वपूर्ण
कुटुंब महत्त्वपूर्ण असल्याचे अध्ययनात सामील 73 टक्के अमेरिकन नागरिकांचे मानणे आहे. डेमोक्रेट समर्थक असो किंवा रिपब्लिकन 10 पैकी 9 लोकांनी अन्य कुठल्याही कामाच्या तुलनेत कुटुंबाला वेळ देणे अधिक पसंत करू असे म्हटले आहे. युवा, नोकरदारवर्ग आणि वृद्ध या सवांनी कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
धर्म-कर्माशी निगडित कार्य
धर्म-कर्मावरून अमेरिकेत मतभिन्नता आहे. 50 टक्के लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे, तर 21 टक्के लोकांकरता हे महत्त्वपूर्ण नाही परंतु आवश्यक आहे. 28 टक्के लोक याला अजिबात महत्त्व देत नाहीत. रिपब्लिक पार्टीकडे ओढा असणारे लोक डेमोक्रेट्स समर्थकांपेक्षा धार्मिक आस्थेला महत्त्व देतात. 61 टक्के रिपब्लिकन समर्थकांनी तर 40 टक्के डेमोक्रेट्स समर्थकांनी धर्म-कर्माला महत्त्वपूर्ण मानले आहे.
शारीरिकदृष्ट्या सक्रीय
31 टक्के अमेरिकन लोक शारीरिक सक्रीयतेला अत्यंत आवश्यक मानतात. तर 43 टक्के लोक आवश्यक मानतात. 23 टक्के लोकांनी याला आवश्यक कामांच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या समर्थकांचे विचार समान आहेत.
भटकंती
हिंडणे-फिरणे आणि निसर्गाच्या सान्निध्याला 29 टक्के अमेरिकन लोक प्राथमिकता देतात. तर 43 टक्के लोक याला आवश्यक मानतात. 23 टक्के लोकांसाठी ही सामान्य बाब आहे. दोन्ही पक्षांचे समर्थक या मुद्द्यावर एकमत बाळगून आहेत.
सृजनात्मक कार्यांशी जोडणे
संगीत, कला आणि लेखन इत्यादी सृजनात्मक कार्यांशी जोडण्याला 43 टक्के अमेरिकन महत्त्व देतात. 40 टक्के लोक सामाजिकदृष्ट्या सक्रीय होणे महत्त्वाचे मानतात. तर सामाजिक आणि राजकीय घडामोडींशी जोडण्यालाही ते महत्त्व देत आहेत.
वयोमानानुसार प्राथमिकता
अध्ययनात 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या (60 टक्के) लोकांना धार्मिक श्रद्धेचे पालन महत्त्वाचे वाटते. तर 18-29 वयोगटातील 40 टक्के लोकांनाच धार्मिक श्रद्धेला महत्त्व द्यावे असे वाटते. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना कारकीर्दीतील यश आणि सृजनात्मक घडामोडी आवश्यक वाटत नाहीत. तर 18-29 वयोगटातील (76 टक्के), 30-49 वयोगट (65 टक्के) आणि 50-64 वयोगटातील (51 टक्के) लोक कारकीर्दीला सर्वात महत्त्वपूर्ण मानतात. या तिन्ही वयोगटात धार्मिक श्रद्धेबद्दल ओढा कमीच दिसून येतो.









