सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी येथील सैनिक मुलांचे वसतिगृह मध्ये अनेक माजी सैनिकांचे विद्यार्थी येथे राहून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या वसतिगृहात उत्तम सोय झाली. त्यामुळे हे विद्यार्थी पदवी व पदवीत्तर शिक्षण पूर्ण करू शकले. त्यामुळे या माजी विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाला 17000 रुपयाची आर्थिक मदत देऊन आपले ऋण व्यक्त केले आहेत. ही आर्थिक मदत अधीक्षक गणपत धुरी यांच्या हस्ते अधीक्षक डीएस पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. वसतिगृहाचे माजी अधीक्षक गणपत धुरी व त्यांच्या सौभाग्यवती सौ धुरी यांचा माजी मुख्याध्यापक व्ही बी नाईक यांच्या हस्ते शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या सैनिक मुलांच्या वस्तीगृहात राहून शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी, सैनिक मुलांच्या वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी अधीक्षक गणपत धुरी, सौ धुरी, माजी मुख्याध्यापक व्ही. बी . नाईक, अधीक्षक डी. एस. पाटील, धनंजय राऊळ, प्रशासकीय अधिकारी तुकाराम बंड, नायब तहसीलदार सुभाष राऊळ, माजी सभापती मोहन सावंत, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, प्राचार्य जगदीश गवस ,मारुती गुंजाळ, ऋषिकेश गावडे ,शंकर खरवडे, संतोष शेडगे ,जयवंत गवस, पुनाजी सावंत ,मनोज शेडगे, शंकर राणे, संजय परब, शेडगे ,गोपाळ, राऊळ आदी उपस्थित होते.