विनाअट राज्यभरात संचार करता येणार , उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोणत्याही परिस्थितीत पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. शक्ती योजनेतंर्गत महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येणार असल्याचे निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने आश्वासन दिले होते. आता मंगळवारी परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी महिलांना खूशखबर दिली आहे. परिवहनच्या बसेसमधून महिलांना मोफत प्रवास करण्यासाठी कोणत्याही अटी असणार नाहीत. सर्व महिलांना राज्यभरात मोफत प्रवास करता येईल, असे सांगितले आहे.
काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली जाणार असल्याचे यापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले होते. त्यानुसार 1 जून रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीवर अधिकृत मोहोर उमटविली जाऊ शकते. मंत्री रामलिंगारे•ाr यांनी मंगळवारी बेंगळूरमधील परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात महिलांना मोफत बसप्रवासासाठी अटी असतील असे सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे सर्व महिलांना परिवहन मंडळाच्या बसेसमधून राज्यभरात मोफत प्रवास करण्याची संधी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्र्यांना विस्तृत माहिती देणार
बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विस्तृत माहिती देण्यात येईल. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेतील. मंगळवारच्या बैठकीत महिलांच्या मोफत बसप्रवासासंबंधी अटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. कोणत्याही अटोशिवाय ही योजना लागू केली जाईल, असेही मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी विधानसौधमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी आपण हा मुद्दा मांडणार आहे. त्याचप्रमाणे मोफत बसप्रवास योजनेसाठी येणारा खर्च, परिवहन निगमवर पडणारा आर्थिक भार यासह सर्व मुद्द्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. अटी लागू करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. विद्यार्थिनी, महिला यांना या योजनेचा लाभ विनामूल्य मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
उत्पन्नाविषयी अधिकाऱ्यांनी दिली माहिती
बैठकीत कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), बेंगळूर शहर परिवहन मंडळ (बीएमटीसी), कल्याण कर्नाटक परिवहन निगम, वायव्य कर्नाटक परिवहन निगम (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी रामलिंगारेड्डी यांना परिवहन खात्याच्या उत्पन्नाविषयी माहिती दिली. परिवहनच्या चारीही निगममध्ये 32,978 बसेस आहेत. तर कर्मचाऱ्यांची संख्या 1,04,450 इतकी आहे. दररोज सरासरी 82.51 लाख जण बसप्रवास करतात. परिवहनच्या चारीही निगममधून प्रतिदिन एकूण 2,313 लाख रुपये उत्पन्न मिळते. वर्षाला 8,946.85 कोटी उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), बेंगळूर शहर परिवहन मंडळ (बीएमटीसी), कल्याण कर्नाटक परिवहन निगम, वायव्य कर्नाटक परिवहन निगम (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी रामलिंगारे•ाr यांना परिवहन खात्याच्या उत्पन्नाविषयी माहिती दिली. परिवहनच्या चारीही निगममध्ये 32,978 बसेस आहेत. तर कर्मचाऱ्यांची संख्या 1,04,450 इतकी आहे. दररोज सरासरी 82.51 लाख जण बसप्रवास करतात. परिवहनच्या चारीही निगममधून प्रतिदिन एकूण 2,313 लाख रुपये उत्पन्न मिळते. वर्षाला 8,946.85 कोटी उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.