रांची
झारखंडमध्ये काँग्रेस आमदार प्रदीप यादव यांच्याशी संबंधित 12 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. रांचीत 4 तर देवघरमध्ये 8 ठिकाणी छापे टाकण्यात आले. प्राप्तिकरच्या एफआयआरशी निगडित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी प्राप्तिकर विभागाने यादव यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. प्रदीप यादव हे पोडैयाहाट मतदारसंघाचे आमदार आहेत.