जगातील सर्वात अजब ठिकाण
पूर्ण जगात विवाहासंबंधीचे नियम वेगवेगळे आहेत. सर्व देशांमध्ये विवाहाकरता अनेक कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतात आजही हुंड्यासारख्या क्रूर प्रथेचे पालन आजही काही जणांकडून होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु जगात एक असे ठिकाण आहे, जेथे विवाहावेळी पुरुषांना नव्हे तर महिलांना हुंडा दिला जातो. तरच या महिला विवाह करत असतात.

हे ठिकाण चीनच्या नानचांग प्रांतात आहे. येथील एका युवतीने विवाहावेळी हुंडा स्वीकारणार नसल्याचे जाहीर केल्यावर या प्रथेचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नानचांग प्रांतात दीर्घकाळापासून विवाहाकरता पुरुषाकडून वधूपक्षाला मोठा हुंडा दिला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात लैंगिक असमानता असल्याने ही प्रथा रुढ झाली आहे. लैंगिक असमानता दूर करण्यासाठी येथे अनेक दशकांपासून हुंड्याचा नियम लागू करण्यात आला आहे, परंतु आता तेथेही बदल घडून येत आहे.
चीनमध्ये मागील काही दशकांपर्यंत एक मूल धोरण कठोरपणे राबविण्यात आल्याने लैंगिक असमानता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खालावल्याने तेथे विवाह जुळणे अवघड ठरले आहे. यामुळे चिनी पुरुष आता पाकिस्तानातील महिलांसोबत विवाह करत असल्याचे वृत्त मधल्या काळात समोर आले होते.









