समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांचा पुढाकार
बेळगाव : विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि. 27 रोजी तर परंपरेने वडगाव भागातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शुक्रवार दि. 26 रोजी निघणार आहे. या चित्ररथ मिरवणुकीत शहर व उपनगरातील जवळपास 70 हून अधिक सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे चित्ररथ सहभागी होतात. यात सहभागी प्रमुख पात्रांची व इतर पात्रांची संख्याही भरपूर असते आणि त्यांना रंगभूषेसाठी कमीतकमी वेळ मिळतो. या सर्व बाबींचा विचार करून म. ए. समितीतर्फे व समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या पुढाकाराने सहभागी सर्व पात्रांची मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे. चित्ररथ मिरवणुकीत सहभागी पात्रांनी विशाल कंग्राळकर 9663039352, किरण सावंत 9480498814, विराज मुरकुंबी 9945864341, राजेंद्र बैलूर 9036505490 यांच्याशी दि. 24 मे पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








