प्रदर्शन आता मोजकेच दिवस राहणार
बेळगाव : सीपीएड मैदानावर भरलेल्या सी टनेल अॅक्वारियम प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या उन्हाळी सुटी सुरू असल्यामुळे बच्चे कंपनी पालकांसमवेत या प्रदर्शनाचा आनंद घेत आहेत. सुट्यांमुळे बाहेर गावांहून आपल्या नातेवाईकांकडे आलेली मुले या प्रदर्शनाला येत आहेत. अंदाजे 20,000 चौ. मी. च्या क्षेत्रात भव्य मत्स्यालय आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन सीपीएड कॉलेज मैदान, क्लब रोड, बेळगाव येथे एप्रिलपासून सुरू झाले आहे. हे मत्स्यालय विरंगुळा आणि मनोरंजन यांची हौस भागविते. या प्रदर्शनात एंजलफिश, क्लाउनफिश, सीहॉर्स, बॉक्सफिश, काउफिश, ईल, रॉस आणि सामान्य सागरी जीवांसह विदेशी प्रजातींचे निरीक्षण करता येते. जलचर जीवनाची सफारीही अनुभवता येते. मत्स्यालयात गोड्या पाण्यातील प्रजातींचे मूळ समुद्री प्रजाती आणि संवर्धनाची गरज असलेल्या प्रजातींचा येथे समावेश आहे. पाण्याखालील अॅक्वा बोगदा आणि वरच्या बाजूला असलेल्या गॅलरीमुळे प्रदर्शन पाहणे सोपे होते. अॅक्वारियममध्ये कोई, एंजेलफिश, स्कॉर्पियन फिश आणि बऱ्याच विदेशी माशांनी भरलेल्या प्रचंड टाक्मया आहेत. सुमारे 500 सागरी प्रजाती प्रदर्शनात आहेत. बेळगावमध्ये प्रथमच हे प्रदर्शन भरत आहे. सदर प्रदर्शनाला बेळगाव, महाराष्ट्र, गोवा येथील नागरिकांनी लहान मुलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता मोजकेच दिवस प्रदर्शन राहणार असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








