सावंतवाडी / प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकार आणि जर्मन सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्याचे आखले धोरण !
गेले आठ दिवस जर्मन दौऱ्यावर असलेले राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी या दौऱ्यात महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन पॅटर्न राबवण्याचे ठरवले आहे. त्यांनी जर्मन धरतीवर कौशल्य विकास आधारित नोकरी या दृष्टीने महाराष्ट्र सरकार आणि जर्मन यांच्या सामंजस्य करार करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील तरुणांना जर्मन मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणारआहे. श्री केसरकर यांनी स्पष्ट केले जर्मन मध्ये कौशल्य विकास आधारित औद्योगिक विकास च्या दृष्टीने रोजगार नोकऱ्या कशा मिळतील या दृष्टीने जर्मनीतील उद्योग व्यवसायिकांशी आपली चर्चा झाली आहे. आपण महाराष्ट्रात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा पॅटर्न राबवणार अशी माहिती दिली .








