लोणावळा / प्रतिनिधी :
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सारा जावेद कुरेशी (वय 15, रा. कोंढवा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर असिम जावेद कुरेशी (10), खैरून रमजान कुरेशी (58), जावेद कुरेशी, नाजणीन कुरेशी, हरीष कुरेशी (सर्व रा. कोंढवा, पुणे) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर रस्त्याच्याबाजूला आयशर टेम्पो क्र. (MH 12 TV 5039) उभा होता. त्याला भरधाव वेगातील कारने (MH 12 NJ 2419) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यात कारमधील एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जखमींना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.







