एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे सध्य़ा सीबीआयच्या (CBI) रडारवर असून त्यांच्यावर शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला कार्डेलिया क्रुझ ड्रग केसमधील कायद्याच्या कचाट्यतून बाहेर काढण्य़ासाठी 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप ठेवला आहे. समीर वानखेडे हे मुंबईतील अनेक संपत्तीचे मालक असून त्यांनी अनेक वेळा परदेश दौरेही केले असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
एनसीबीने (NCB) दाखल केलेल्या अहवालानुसार, माजी अंमली पदार्थ विरोधी अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्या कुटुंबासह अनेक वेऴा परदेश दौरे केले आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोताच्य़ा तुलनेपेक्षा जास्त मालमत्ता आहे. NCBने आपल्या अहवालात असाही दावा केला आहे की, वानखेडेने 2017 ते 2021 या कालावधीत आपल्या कुटुंबासह एकूण सहा परदेश दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवला या ठिकाणी भेटी देऊन एकूण 55 दिवस परदेशात राहिले आहेत असा दावा केला आहे. दरम्यान, वानखेडे यांनी आपण केवळ 8.75 लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे.
एनसीबीच्या अहवालात वानखेडे यांच्याकडे महागडी घड्याळेही आहेत ज्यामध्ये 17 लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळाचा समावेश आहे. याच बरोबर मुंबईत चार फ्लॅट आणि वाशिममध्ये 41,688 एकर जमीन असल्याचा धक्कादायक दावाही करण्यात आला आहे. सीबीआयचा दाव्यानुसार वानखडेंची मालमत्ता त्याच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांशी मेळ खात नसून त्याच्या परदेश दौऱ्यात केलेल्या खर्चाचे विवरणही ते करू शकले नाहीत.







