पावसाळा सुरु होत आहे त्याआधीच नाल्यातील साचलेला गाळ काडून सफाई करणे गरजेचे आहे. बेळगाव शहरात असलेल्या नाल्यांतून गाळ न काढल्याने ते तुडुंब भरलेले आहेत. पावसाळा सुरु झाल्यावर नाले तुंबून भरून वाहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्या आधीच नाल्यांची सफाई करणे जरुरीचे आहे. मात्र आता पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी बेळगावकरांना अद्याप नालेसफाईची प्रतीक्षा करावी लागत आहे.
नाल्यातील गाळ, कचरा अद्याप नाल्यातच आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. डासांची उत्पत्तीही वाढल्याने सांसर्गिक रोगाची भीती देखील वाढली आहे. संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष पुरवून नाल्यांची दुरावस्था दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.