सावंतवाडी / प्रतिनिधी
स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण , शिक्षणमंत्री दीपककेसरकर तसेच आरोग्य मंत्री यांच्याकडे केलीये . त्यांनी लक्ष देऊन यामध्ये दोन वर्षाची मुदत वाढ द्यावी अशी मागणी साळगावकर यांनी केलीय . यापूर्वी डॉक्टर उत्तम पाटील यांना दोन वर्षाची मुदत वाढ देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने डॉक्टर दुर्भाटकर यांना मिळावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग ,माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर ,माजी पाणीपुरवठा सभापती ,अप्रोज राजगुरू माजी आरोग्य सभापती विलास जाधव, माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे, अशी मागणी माजी नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर महिलांसाठी देवदूत म्हणून ओळखले जातात.








