प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी प्राध्यापक संघाच्या अध्यक्षपदी आरपीडी कॉलेजच्या हिंदी विभागाचे प्रा. विजयकुमार पाटील यांची निवड करण्यात आली. भरतेश कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेमध्ये ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष डॉ. राजेंद्र पोवार होते. जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एम. डी. गुरव, बागलकोटसाठी डॉ. मंजुळा चव्हाण, विजापूरसाठी डॉ. जी. पी. साळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदस्य समितीमध्ये डॉ. सी. डी. ठाणे व प्रा. झाकीर मुलतानी (बेळगाव), डॉ. नारायण बगली व प्रा. शेखाप्पा राठोड (विजापूर), डॉ. एम. बी. जमादार व डॉ. सुनील सालीमनी (बागलकोट) यांची निवड करण्यात आली.
सल्लागार समितीमध्ये डॉ. राजेंद्र पोवार, प्रा. एम. ए. पीरा, प्रा. शंकरमूर्ती, डॉ. सुनील ताटे, प्रा. महादेव हे•रे यांची निवड करण्यात आली. खजिनदार अमित चिंगळी यांनी अहवाल सादर केला. डॉ. राजेंद्र पोवार यांनी नवीन अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे स्वरुप, पाठ्यापुस्तकांचे संपादन याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. विजयकुमार पाटील यांनी हिंदी भाषेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. डॉ. डी. ए. मुल्ला, प्रा. जयश्री अंची, प्रा. नीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.








