प्रतिनिधी / बेळगाव
किल्ला तलाव महांतेशनगर परिसरात गेल्या 18 वर्षांपासून ‘सकाळ योग ग्रुप’च्यावतीने सुरू असलेल्या योग क्लासचा अठरावा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी योग मार्गदर्शक विनायक जोशी होते. कार्यक्रमाला सोमनाथ कांबळे, अण्णा शहनाई, अस्लम मुल्ला, संजय गुरव, सुरेश डोंगरे, शिवानंद वालसंग, अनंत कणेरी व इतर अनेक नागरिक उपस्थित होते.
या वर्गासाठी डॉ. रवी पाटील यांनी नेहमीच सहकार्य केले असून गेल्या अनेक वर्षांपासून हा क्लास चालू ठेवून नागरिकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास सहकार्य केल्याबद्दल विनायक जोशी यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन शिवाजी बडगेर यांनी तर आभार महानंद झूट्टी यांनी मानले.









