रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीत भीषण पाणी टंचाईचा सामना सध्या नागरीकांना करावा लागतोय रत्नागिरी शहरात एकदिवसा आड पाणी उपलब्ध होतय त्यामुळे नागरीकांचे पाण्यावीना सध्या हाल होताहेत या पाणी टंचाईच्या काळात सौरभ मलुष्टे हा उमदा तरुण जलदूत बनून रत्नागिरीकरांसाठी उभा राहीलाय त्यानं रत्नागिरी शहरातील काही भागात मोफत पाण्याच्या टँकरची व्यवस्था उपलब्ध करुन दिलीय.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई सुरु झाली भूजल पातळी खाली गेल्या अनेक विहीरी , पाणवठे कोरडे झाले बहुतांश भागात टँकरेने पाणीपुरवठा सुरु आहे रत्नागिरी शहरात देखील पाणी टंचाईची दयनीय अवस्था आहे.शहरातील नागरीकांना एकदिवसआड जेमतेम पाणी मिळतय. अशा परिस्थितीत सामाजिक भान म्हणून शहरातील उमदा तरुण सौरभ मलुष्टे जलदूत बनून रत्नागिरीकरांसाठी पुढे आलाय.. पाच मे पासून त्यांनी शहरातल्या विविध सोसायटींना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलाय.सकाळी 7 वाजल्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरु होतो.दिवसाला 15 ते 20 टँकर शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा करतात आत्तापर्यंत जवळपास 10 लाख लिटर पाणी रत्नागिरीकरांना टँकरद्वारे विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आलेय.पाऊस पडेपर्यंत टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरु ठेवला जाणार आहे.
रत्नागिरी शहरातील जवळपास 70 हून अधिक सोसायटींना ते एक दिवस आड मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय ज्यांना पाण्याची गरज आहे अशांची तहान भागवली जातेयत. रत्नागिरी शहरात विकत देखील जिथे टॅंकर मिळत नाही अशा वेळेला सौरभ मलुष्टे हे रत्नागिरी करांसाठी जल दूत बनून सध्या रत्नागिरीकरांची तहान भागवत आहेत. जवळपास सहा हजार लोकांची त्यांनी तहान या मोफत पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून भागवली आहे.
वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारी वृक्षतोड परिणामी जलसाठे नष्ट होऊ लागलेत त्यामुळे शहरी भागातील नागरीकांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय भुजल पातळी खाली गेल्यानं मर्यादीत पाणीपुरवठा केला जातोय.पाणीटंचाईची समस्या भेडसावणा-या रत्नागिरीकरांसाठी सौरभ मलुष्टे यांसारखे जलदूत पुढे येण गरजेचे आहे प्रशासनानं देखील पाणी टंचाईवर ठोस उपाय योजना करणं गरजेचं आहे तरच पाणी टंचाईच दरवर्षी भेडसावणारा प्रश्न मार्गी लागेल.