अनिका नायक, अर्थव हुबळीकर उपविजेते

बेळगाव : हुबळी येथे शटलपेस्टा बॅडमिंटन संघटना व कर्नाटक जिमखाना संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत तनिष्का कोरी शेट्टीने 17 व 15 वयोगटात विजेतेपद पटकावित दुहेरी मुकूट तर अर्थव हुबळीकर व अनिका नायक यानी उपविजेतेपद पटकाविले. हुबळी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील दुहेरी गटात तनिष्का कोरे शेट्टीने उपांत्यपूर्व फेरीत अर्पितचा 21-5 अशा गुण फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तनिष्काने साक्षीचा 21-7, 21-5 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात साक्षीचा 21-8, 21 -8, अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील गटात उपांत्यपूर्व फेरीत रितीचा 21 -8 असा पराभव केला. उपांत्यफेरीत तनिष्काने सीयाचा 21 -9 21 -10 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात तनिष्काने साक्षीचा 21 -17 21-14 अशा गुण फरकाने विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्थव हुबळीकरने उपांत्यपूर्व फेरीत गौतमचा 21 -8 असा पराभव केला. उपांत्य फेरीत अर्थवने प्रथमचा 21 -11, 21 -14 असा पराभव केला. तर अंतिम फेरीत अग्रमानांकित मार्टीनकडून अर्थवला 21 -13, 21 – 15 अशा गुण फरकाने पराभव व्हावे लागले. 11 वर्षाखाली मुलींच्या एकेरीत अनिका नायकने उपांत्यफेरीत उर्वीचा 21 -15, 21-17 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात अनिकाला अग्रमानांकीत असिताकडून 21-14, 21 -17 असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत अनिका नायक व अथर्व हुबळीकर यांना उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले. या बॅडमिंटन पटूंना बॅडमिंटन प्रशिक्षक भुषण अणवेकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन तर बेळगाव जिल्हा बॅडमिंटनचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









