► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआय प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली आपली अंतरिम जामीन याचिका मागे घेतली आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी मनीष सिसोदिया यांच्या पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे लक्षात घेऊन जामीन याचिका फेटाळण्याचे आदेश दिले. सिसोदिया यांनी पत्नीची प्रकृती बिघडत असल्याचे सांगत अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे, मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी मनीष सिसोदियांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली. सीबीआय प्रकरणी 27 मे रोजी दुपारी 4 वाजता न्यायालय आपला निकाल देणार आहे. तसेच ईडी प्रकरणात 30 मे ही निर्ण देण्याची तारीख निश्चित केली आहे.









