शिरोळ प्रतिनिधी
येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळ असलेले विद्युत पोल अद्याप हटवले नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात असून तातडीने हे दोन विद्युत पोल हलवण्याची मागणी होत आहे
अर्जुनवाढ ते पाच मैल फाटा या रस्त्याचे काम सुरू आहे येथील बसवेश्वर चौक ते शिरटी फाट्यापर्यंत अत्यंत संत गतीने रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्याच्या यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी मध्यवर्ती रस्त्यावरच दोन विद्युत पोल आहेत हे दोन्ही विद्युत पोल ठेकेदाराने हलवले नसल्याने मोठा अपघात होण्याची भीती नागरिकातुन व्यक्त केली जात आहे संबंधित ठेकेदाराचे बिले अद्याप मिळाले नसल्याने ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष केले असली ती समजते एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वारंवार सांगूनही ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहे तातडीने पोल हलविले गरजेचे आहे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे
सध्या या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मिरज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे तसेच हा तातडीने विद्युत पोल न हलविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.









